Friday, November 22, 2024
HomeNewsकुरेशी समाजावरील अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन

कुरेशी समाजावरील अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन

भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या – रघुनाथदादा पाटील

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज पुण्यात ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमिटी च्या वतीने तीव्र निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले .
            पावसाची अनियमितता कायम दुष्काळी परिस्थिती अशा वेळी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अतिशय अवघड आणि कष्टाचे जात असून राज्य सरकारने भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.ते कुरेशी समजाच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
         यावेळी पुणे जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन कत्तलखाने चालू करावे,उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचा मुद्देमाल परत मिळावा,आमचा व्यवसाय करीत असताना गुंड प्रवूर्तीकडून होणारा अन्याय अत्याचार तात्काळ थांबवावा महाराष्ट्र सरकारने कुरेशी समाजाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज पुण्यात कुरेशी समाजाच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
     या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया जमियतुल कुरेशी एक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी,शहराध्यक्ष हसन कुरेशी,शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील,माजी राज्यमंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी,माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण,वंचित आघाडीचे अध्यक्ष मुनवर कुरेशी,भीम आर्मी चे अध्यक्ष दत्ता पोळ,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागाळे,रिपब्लिकन युवा मोर्चा चे अध्यक्ष राहुल डंबाळे,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अंजूमभाई इनामदार यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व मुस्लिम समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय