Friday, May 17, 2024
Homeजिल्हाव्हिडिओ : जमिनीवर अतिक्रमण कराल तर गाठ माझ्याशी – आ. विनोद निकोले

व्हिडिओ : जमिनीवर अतिक्रमण कराल तर गाठ माझ्याशी – आ. विनोद निकोले

डहाणू : आम्ही या मातीत जन्मलो, या जमिनींवर आमचाच अधिकार आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकले यांनी झारली येथे सांगत जमिनीवर अतिक्रमण कराल तर गाठ माझ्याशी आहे असा आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, झारली येथील आपण ज्या जागेत आता उभे आहोत ही जागा ग्रामपंचायती जागा आहे. आपण सन 2017 पासून या जागेचा पाठपुरावा करतोय. दरम्यान कोणी एक व्यक्ती एका संघटनेशी हात मिळवणी करून जागा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. आपण सर्वांनी मिळून हे धुडकावून लावले. ही अभिनंदनास्पद बाब आहे. आपण ज्यांची प्रेरणा घेतो ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी आपल्याला लढायला शिकवले आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला अधिकार दिला आहे. आपण जो कर भरतो, तो कर सरकार तिजोरीत जमा होतो. त्यातूनच आपल्याला सरकार सोयीसुविधा देते. हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, इतर कोणत्याही जातीचा माणूस असो ! जो गरीब आहे त्याचा पक्ष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा एकच पक्ष आहे. 

महागाई, बेरोजगारी विरोधात डावे पक्ष मैदानात, देशव्यापी आंदोलनाचा नारा

सरकारची जवाबदारी आहे की, आमच्या मुलांना जोपर्यंत तो शिकेल, तोपर्यंत त्याला मोफत शिकवले पाहिजे. पॉवर दोन प्रकारची असते एक पैसा आणि दुसरी म्हणजे जनतेचे संघटन ची. आम्ही संघटन करतो. ज्याचं रक्त लाल आहे त्याच्यासाठी लाल बावटा आहे. आता एक पक्ष देव – देव करतोय. अरे..! माणूसच देव आहे. त्याच्या गरजा पूर्ण करा. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण देऊन त्याला परिपूर्ण बनवा. संस्कृती वर राजकारण नको, पोटावर राजकारण असायला पाहिजे. पोटावर राजकारण म्हणजे बेरोजगारांना रोजगार द्या. त्याच्या पोटाला अन्न मिळेल असं काहीतरी योजना राबवा असे तब्बल दीड तासाचे भाषण आमदार कॉ. विनोद निकोले यांचे झाले. दरम्यान त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांचे जोरदार पणे कानपिचक्या देखील घेतल्या.

यावेळी माकप पालघर जिल्हा सेक्रेटरी कॉ. किरण गहला म्हणाले की, आपल्या हक्कासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आवश्यक पडेल तेव्हा मोठे आंदोलन देखील आपण उभारू. 

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

तसेच किसान सभेचे अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखाना म्हणाले की, आदिवासी संस्कृती जपली पाहिजे. वन विभागातील कर्मचारी व अधिकारी हे भेदभाव करत असल्याने त्यांचा घोरखाना यांनी जोरदार समाचार घेतला.

याप्रसंगी किसान सभेचे धनेश अक्रे, चिकला युनिट सेक्रेटरी कमलेश राबड, कैनाड युनिट सेक्रेटरी विजय वाघात, डीवायएफआय चे तालुका सेक्रेटरी राजेश दळवी, भरत कान्हात, सीटू चे जगदिश जाधव, जनवादी महिला संघटना लता घोरखाना, सुक्रेत्या उबंरसाडा, सुमित्रा बरफ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसाद कुलकर्णी यांना ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ जाहीर

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान! ‘ – लक्ष्मीकांत देशमुख

विधवा प्रथा बंदी साठी लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चा पुढाकार !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय