Friday, May 3, 2024
Homeजिल्हाव्हिडीओ : तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदयविकाराचा झटका, पुढे काय घडले...

व्हिडीओ : तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदयविकाराचा झटका, पुढे काय घडले पहा !

कोल्हापूर : कोल्हापुरात डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीला डॉक्टरांसमोरच हार्ट अटॅक आला, मात्र डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे.

कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच रुग्णाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीवर हाताने हलके ठोके देत रुग्णाचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोल्हापूरमधील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून डॉक्टरांचे कौतूक केले जात आहे. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. ही घटना म्हणजे डॉक्टरांनी या व्यक्तीला नवं आयुष्यच देलं असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय