Saturday, April 20, 2024
HomeNews६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने ४६ जणांचा मृत्यू

६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने ४६ जणांचा मृत्यू

चीन : चीनच्या दक्षिणपूर्व भागात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून, ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे इमारती आणि घरांना मोठे हादरे बसले आहे, त्यामुळे घरांच मोठे नुकसान झाले आहे. यात ४६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

सध्या चीन मध्ये पुन्हा करोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे तेथे निर्बंध लागू असल्याने लोकांना आपलं निवासस्थान सोडण्याची परवानगी नाही. अशात या भुकंपाच्या धक्क्याने चीनवर दुहेरी संकट ओढवले आहे. चेंगडू येथे भूकंपानंतर अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे. यासोबतच १० हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय