वासत्या
✍️ सुरेश गावित ✍️
सुरगाणा
पशु-पाखरे माझे मित्र
मी त्यांना सजविणारा..
निसर्गाची पुजा करून
त्यांना घडविणारा..
बारशा,अखात्या, बैलपोळा
असे सण साजरे करणारा..
पानदेव,रानदेव,माऊली,
रानवा या देवांना मांडणारा..
ढोल,पावरी,ढोलकी,थाळी
हे वाद्यक सोबत ठेवणारा..
भाया,ठाकऱ्या,अशा
ठिकाणी नाचणारा…
तेरा,वासत्या,दीहगडी,
चिकण्या,अशा भाज्या
खाणारा…
पूर्वीच्या परंपरेची
जाणीव करून देणारा…
तंट्या भिल्ल, बिरसा मुंडाच्या
विचाराला जागणारा …
दऱ्या, खोऱ्याला जपणारा..