Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवशिष्ठी नदीला महापूर, चिपळूण शहराला पाण्याचा विळखा

वशिष्ठी नदीला महापूर, चिपळूण शहराला पाण्याचा विळखा

चिपळूण : कोकणात गेले दोन दिवसात संततधार पाऊस पडत आहे, कोकणात सर्वत्र पावसाने मुसळधार सुरू केली आहे. परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून त्यामुळं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.



वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे.शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.



शहरातील बाजारपेठ, मुरादपूर, शंकरवाडी, खेर्डी, एस टी स्टॅण्ड आणि चिंचनाका परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली असून अनेक नागरिकांनी घराबाहेर राहणं पसंत केलं. रात्रीपासून चिपळूणमधील पावसाचा जोर कमी झालेला असला तरी वशिष्ठी नदीतील पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे. त्यामुळं चिपळुणसह खेड तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना तात्पुरतं स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहे.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय