Friday, November 22, 2024
Homeराज्यराजकारण सोडा; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करूनच निर्णय. उदय सामंतांचे विरोधकांना सुचक उत्तर.

राजकारण सोडा; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करूनच निर्णय. उदय सामंतांचे विरोधकांना सुचक उत्तर.

(प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करूनच महाराष्ट्र शासन निर्णय घेत आहे. विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरविणाऱ्या काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे आज उदय सामंत यांनी म्हटले आहे, ते दापोली येथे बोलत होते.

          राजकिय इतिहासात आजपर्यंत गाजला नसेल असा अंतिम वर्षाच्या परिक्षांचा विषय गाजतो आहे. परंतु परिक्षा रद्द केल्यानंतरही ज्यांना मार्क वाढवायचे आहेत त्यांना परत परिक्षा देण्याची मुभा दिली आहे. बाकीच्या राज्यांना आणि संस्थांनी केलेला अभ्यास टिकाकारांनी लक्षात घ्यावा! आयआयटी सारख्या उच्चतम संस्थेने परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने परिक्षा रद्द केल्या आहेत. उत्तरप्रदेश, ओडिशा, तेलंगणा या राज्यांनी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

         भाजपाला निशाणा करत त्यांनी काही लोकं इतर राज्यात विरोधी पक्षात आहेत, तेथे परिक्षा रद्द करण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचा हे लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरवर आमच्या निर्णयाने कुठलाही परिणाम होणार नसल्याचे उदय सामंत म्हणाले.

      राजकीय भांडवल करून टिका टिप्पणी बंद करावी, विद्यार्थी हिताचा विचार करावा. युजीसीला लिहिलेल्या पत्रावर मी ठाम असल्याचे उदय सामंत म्हणाले.

           विद्यार्थी, पालकांनी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांंच्या टिका टिप्पणीला बळी पडू नये, विद्यार्थी, पालक यांना समजून घेऊन आणि विद्यार्थ्यांंचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, हाच महाराष्ट्र शासनाचा विशेष प्रयत्न आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय