Monday, March 17, 2025

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दमदार विजयाकडे वाटचाल ; मात्र नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

कोलकत्ता : देशातील आज पाच राज्यांचे निवडणुक निकाल जाहीर होत आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र नंतर तृणमूलनं जवळपास १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १०० जागांच्या आसपास पोहोचताना दिसली.

तृणमूलनं शंभरी पार करताच जोरदार मुसंडी मारली. आता तृणमूल काँग्रेस पक्ष २१९ च्या जवळ पोहोचला आहे. तर शंभरी पार केलेला भाजप आता खाली येताना दिसत आहे. सध्या भाजप ७१ जागांवर आघाडीवर आहे.

पश्चिम बंगाल मध्ये २९४ विधानसभा जागा आहेत. यापैकी २ ठिकाणचं मतदान रद्द झालं आहे त्यामुळे आज २९२ जागांवरील निकाल जाहीर करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर असताना नंदिग्राममधून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १९५३ मतांनी पराभव केला आहे. ममता यांचा पराभव झाल्यामुळे तृणमूलसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक वाचा

केरळ मध्ये पुन्हा डावे ; पिनराई विजयन यांनी घडवला इतिहास

Related Articles

- Advertisement -

Latest Articles