Sunday, May 5, 2024
Homeराज्यआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (TRITI) पुणे च्या बिगर आदिवासी संचालकांची हकालपट्टी...

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (TRITI) पुणे च्या बिगर आदिवासी संचालकांची हकालपट्टी करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

पुणे  : –  महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समुहाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी गतिमानता यावी यासाठी यशदा, पुणे व बार्टी, पुणे यांच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), महाराष्ट्र राज्य पुणे ही संस्थेच्या रौम्य महोत्सवी वर्षानिमीत्ताने सन – 2013 साली स्वायत्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रामुख्याने नवनवीन संशोधन व प्रशिक्षण यांची समाज विकासासाठी आवश्यकता ओळखून ते शासकिय पातळीवर कोणत्या प्रकारे राबविण्यात येतील असा उद्देश आहे, मात्र यासर्व उद्देशाना धाब्यावर बसवून बिगर आदिवासी अधिकारी व संचालकांनी आपल्या स्वतःच्या संस्थाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी उपयोग केल्याचे आरोप ऑल महाराष्ट्र स्टुडंन्ट्स ट्रायबल असोसिएशन ने एका निवेदनाद्वारे केला आहे.

संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या नियामक व कार्यकारी मंडळात बिगर आदिवासी डॉ. आर. के. मुटाटकर, मिलींद बोकील तसेच डॉ. किरण कुलकर्णी हे आयुक्त असतांना त्यांच्या मर्जीतील तज्ञ संचालक म्हणून बिगर आदिवासींना सामावून घेतले त्या पुराव्यासाठी यांच्या कालावधीत झालेल्या नियामक व कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकांचे इतिवृत्त पाहावे. तसेच संस्थेच्या नियामक मंडळ व कार्यकारी मंडळात आदिवासी संचालक सुध्दा आहेत मात्र त्यांना बऱ्याच बैठकांना बोलवले जात नाही व निर्णय प्रक्रियेत सुध्दा सामावून घेतले जात नाही असाही आरोप संघटनेने आपल्या निवेदनात केला आहे. 

डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त असतांना आणि नंदिनी आवडे यांच्याकडे प्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार असतांना तसेच सध्याच्या आयुक्त पवनीत कौर या सर्वांच्या काळावधीतील आर्थिक निर्णयांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच जे बिगर आदिवासी संचालक म्हणून नेमले आहेत त्यांची तात्काळ हाकलपट्टी करावी आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी ऑल महाराष्ट्र स्टुडंन्ट्स ट्रायबल असोसिएशनने केली आहे.

याशिवाय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आदिवासी विकासाचे उद्दीष्ट पूर्ण होणार नाही असे संघटनेने म्हंटल आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय