Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनासहशिक्षक अनंत देशमुख यांचे दु:खद निधन !

सहशिक्षक अनंत देशमुख यांचे दु:खद निधन !

परळी वैजनाथ : न्यू हायस्कूल थर्मल परळी येथील सहशिक्षक अनंत बाळासाहेब देशमुख (मोहेकर) यांचे आज दि.२६ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई व भाऊ असा परिवार आहे.

अनंत देशमु हे कोविड -१९ च्या कामात पंचायत समिती परळी येथे आरोग्य विभागात कर्तव्य बजावत असताना दि. १२ सप्टेंबर रोजी कोरोना बाधित आढळल्याने अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी ऍडमिट झाले व उपचार सुरू असतानाच दि.२६ सप्टेंबर शनिवार रोजी संध्याकाळी ८.०० च्या दरम्यान दुःखद निधन झाले.

परिवारातील जबाबदार अशा व्यक्तीच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे. या दुःखात राष्ट्रवादी शिक्षक संघटना सहभागी आहे. कर्तव्य बजावत असताना करोनाची बाधा झाल्यामुळे शिक्षण विभाग व शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय