Sunday, December 8, 2024
Homeक्रीडाविश्वटोकियो ऑलिम्पिक : मीराबाई चानूनं रचला हतिहास

टोकियो ऑलिम्पिक : मीराबाई चानूनं रचला हतिहास

टोकयो : टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.

चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले. 

भारताकडून करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकले होते. मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. मल्लेश्वरीनंतर चानूकडून भारताला मोठ्या आशा होत्या. रियो ऑलिम्पिकनंतर जवळपास प्रत्येक स्पर्धेत चानूनं मेडल जिंकले होते. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहे. त्याचबरोबर एशियन चॅम्पियनशिपमध्येही चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.


संबंधित लेख

लोकप्रिय