Friday, May 17, 2024
HomeNews'जात विसरणे म्हणजे बुद्धांच्या विचारांच्या दिशेने वळणे' श्रीपाल सबनीस

‘जात विसरणे म्हणजे बुद्धांच्या विचारांच्या दिशेने वळणे’ श्रीपाल सबनीस

पुणे : एकाच महापुरूषाचा अभिमान बाळगणारे विद्वान प्रगल्भ नसतात. सर्वच महापुरुषांचे चांगुलपण, विचारांचे सामर्थ्य स्वीकारून त्याद्वारे समाजाला नवीन दृष्टी देणारे विद्वान महत्त्वाचे असतात.जात विसरून वागणे म्हणजे गौतम बुद्धांच्या विचारांच्या दिशेने वळणे होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

माता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत आचार्य रतनलाल सोनग्रा आणि अशोक नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुलक्षणा शिलवंत-धर यांना ‘प्रा. विलास वाघ स्मृती जीवनगौरव पुरस्कार’ सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. धर यांच्या वतीने हा पुरस्कार कल्पना शिलवंत यांनी स्वीकारला. याप्रसंगी ॲड. प्रमोद आडकर, माजी नगरसेविका लता राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सोनग्रा म्हणाले, ”प्रा. वाघ यांचे कार्य, कर्तृत्व, निष्ठा, तळमळ याला तोड नाही. सर्वसाधारण गावातून पुण्यासारख्या शहरात येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली चळवळ त्यांनी पुढे नेली. शांततामय विचारांची पखरण केली.” कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. विनोद शहारे यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय