Saturday, May 18, 2024
HomeNewsथरारक ! पुराच्या पाण्यात वाहून जाताना बारामतीत एकाला वाचवले .

थरारक ! पुराच्या पाण्यात वाहून जाताना बारामतीत एकाला वाचवले .

पुणे :बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे.
बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.

पुरंदर आणि बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने ओढेनाले भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे कोरडी असणारी कऱ्हा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. नाजरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, बगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय