Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतीन दिवशीय युवा नेतृत्व समुदाय विकास कार्यशाळा उत्साहात कम्युनिटी डॉक्टर- कम्युनिटी...

तीन दिवशीय युवा नेतृत्व समुदाय विकास कार्यशाळा उत्साहात कम्युनिटी डॉक्टर- कम्युनिटी कार्यकर्ता उपक्रमाचा वर्धापन दिन

आळंदी/अर्जुन मेदनकर : येथील मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचालित श्री मोरया इंस्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स चिंचवड व चंद्ररंग पॅरामेडिकल कॉलेज सांगवी यांचे युवा नेतृत्व व समुदाय विकास कार्यशाळा तीन दिवसीय शिबिर चैतन्यधाम आश्रम सुस नांदे येथे उत्साहात पार पडली.

मोरया सामाजिक प्रतिष्ठान, चंद्ररंग पॅरामेडिकल कॉलेज सांगवी,मोरया इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स चिंचवड,कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय युवा नेतृत्व समुदाय विकास कार्यशाळा निवासी शिबिर चैतन्यधाम आश्रम सुस नांदेगाव आयोजित करण्यात आली होती.या शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे ACP श्रीकांत डीसले,नगरसेवक शंकरभाऊ जगताप,चैतन्यधाम आश्रमचे संस्थापक काळे गुरुजी, मोरया सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गणेश अंबिके, हेमराज थावाणी आदी पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. तीन दिवसीय शिबिरात अनेक नामावंत व्याख्याते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या व्याख्यातांमध्ये एसीपी श्रीकांत डीसले यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच ध्येय, जिद्द चिकाटी यावर ठाम राहिलं तर आयुष्यात यशस्वी होता येते हे सांगितले. नगरसेवक शंकर भाऊ जगताप यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, वक्तशीरपणा व उच्च ध्येय ठेऊन यश कसे प्राप्त करावे या बद्दल मार्गदर्शन केले. वक्ते प्रदीप देवांग यांनी पाणी या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान देऊन पाण्याचे महत्व व पाणी ही काळाची गरज स्पष्ट केले.यावेळी सागर बोंबले, संतोष काळे गुरुजी आदी उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी प्रा.सुभाष राठोड सरांनी विद्यार्थ्यांना जीवनात घेतलेले धाडसी निर्णय,जीवनाची जडणघडण, आणि सामान्य परिस्थिती असली तरी स्वप्न कशी पूर्ण होऊ शकतात. या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. देशपांडे यांनी लोकसंख्या व युवाशक्ती विषयांवर व्याख्यान दिले. युवा शास्त्रज्ञ व संशोधक अभिषेक तेली यांनी सातत्यपूर्ण परिश्रम आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर ती आपल्याला नक्की प्राप्त होते,या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सुरेखा तेली, अशोक भुजबळ उपस्थित होते. सुप्रसिद्ध वक्ते चैतन्य इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य क्षेत्रातील नवीन संधी शोधाव्या असे सांगितले.


डॉ.निंभोरकर यांनी आहार पद्धती, चांगल्या सवयी, ताणतणाव नियंत्रण यावर व्याख्यान दिले. महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक शहाजी सोळुंके यांची या शिबिरासाठी विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना उच्च ध्येय ठेवले तर आपल्याला कसे यशस्वी होता येते सातत्य, जिद्द, चिकाटी,प्रामाणिकपणा हे गुण विद्यार्थ्यांमध्ये असावे तसेच विद्यार्थी सुरक्षा व उपाययोजना यावर व्याख्यान दिले. यावेळी न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलच्या प्रमुख पवार मॅडम उपस्थित होत्या.

तिसऱ्या दिवशी डॉ.भक्ती वारे मॅडम यांनी संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास या विषयावर व्याख्यान दिले. तसेच सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन रानडे सर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन येत असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी अनेक महापुरुषांचे अनुभव व छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देऊन मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साईदीप बँकचे संस्थापक योगेश जाधव, दीक्षित मॅडम,डॉ.संजय वाडकर, डॉ.संतोष पवार,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रानवडे, पत्रकार गणेश अभिमाने,महेश डोंगरे,वरद अंबिके उपस्थित होते. या शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक शंकरभाऊ जगताप, माऊली जगताप उपस्थित होते.

कम्युनिटी डॉक्टर- कम्युनिटी कार्यकर्ता या संस्थेचे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी करत असलेल्या सामजिक, आरोग्य व शैक्षणीक योगदाना बद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आहे. यामध्ये सिद्राम रायचुरकर, विरेश छाजेड, डॉ. सरोज अंबिके, धनंजय जगताप, दीपाली महाजन, डॉ धनश्री भुजबळ, मिहिर जाधव, डॉ. ज्योती यादव, आदित्य हरिहर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर, डॉ. संजय वाडकर, डॉ. संतोष पवार यांचा सन्मान पात्र देऊन गौरव करण्यात आला. संपुर्ण शिबिरातील विद्यार्थांना व विद्यार्थिनींना रोज सकाळी डॉ. विशाल गुरव यांनी योगा व झुंबा या माध्यमातून शारीरिक विकास व स्वास्थ उत्तम राहावी म्हणून योगदान दिले. शिबिर यशस्वी करण्यास बाळासाहेब रानवडे, युवा पत्रकार गणेश अभिमाने, डॉ.विशाल गुरव, आरती विभुते, राजेश डोंगरे, प्रीतम किर्वे, संतोष चव्हाण, हनुमान खटिंग, वरद अंबिके, प्रणव वाघमारे, अनिल शिरसाट आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय