Sunday, May 5, 2024
HomeNewsयंदा दसऱ्याला झेंडू शंभरी गाठणार !

यंदा दसऱ्याला झेंडू शंभरी गाठणार !



कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी सण- उत्सव जोमाने साजरे होत आहेत. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाची धूम सुरु आहे. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याची तयारी जोमाने सुरु आहे.या वर्षी अतिवृष्टीमुळे झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, फुलांचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात फुलांचे दर किलोला ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

किरकोळ खरेदीसाठी ग्राहकांना किलोमागे किमान शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. दर्जेदार फुलांचा भाव सव्वाशे ते दीडशे रुपये किलो दरम्यान राहू शकतो. नवरात्रोत्सवामुळे फुलबाजार तेजीत आहे. (Flower market booming in wake of Dussehra 2022 Marigold will reach hundred )

कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. मंदिरे बंद असल्याने सलग दोन वर्षे फुल व्यवसायाला मोठा फटका बसला. या वर्षी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड, मनमाड, दिंडोरी, कळवण व नाशिकच्या काही भागात झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घेतले जाते. या वर्षी वेळोवेळी पाऊस होत गेला.पीक दमदार अवस्थेत असतानाच अति पावसाचा फटका बसला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय