Thursday, March 28, 2024
Homeजिल्हानारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत 'गांधी जयंती' आणि 'लालबहादूर शास्त्री जयंती' साजरी

नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत ‘गांधी जयंती’ आणि ‘लालबहादूर शास्त्री जयंती’ साजरी

पुणे : भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत २ ऑक्टोबर ‘गांधी जयंती’ आणि ‘लालबहादूर शास्त्री जयंती’ साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रपुरुषां विषयी माहिती व्हावी, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, संस्कार व्हावे, आदर्श, नित्य मूल्य रुजावीत, सुसंस्कार व्हावे, राष्ट्राभिमान निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, नारायण हट सोसायटीतील सभासद सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधीजी आणि ‘जय जवान जय किसान!’ या घोषणाचे प्रणेते माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन अक्षरा इंचनाळकर, कुशल संत यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सायली संत यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी ‘लालबहादूर शास्त्री’आणि ‘महात्मा गांधी’ यांच्या कार्याची ओळख स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली. महात्मा गांधी जयंती निमित्त “श्रमदान कार्यक्रमाचे” आयोजन करून शालेय परिसर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी स्वच्छ करून साफसफाई केली प्लास्टिकचे निर्मूलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, अध्यक्ष संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे, डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार तारळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, प्रवीण भाकड यांनी केले.‌कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुशराव गोरडे यांनी केले. आभार प्रतिभा तांबे यांनी मानले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय