कोलेस्टेॉल एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. रोज तुम्ही ज्या ड्रिंक्सचं सेवन करता ते बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतात.कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढणं एक गंभीर समस्या बनत चालली आहे.हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्त ब्लॉक करतं. ज्यामुळे हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. Dr. विनोद शर्मा यांनी सांगितलं की, कोणत्या ड्रिंकमळे कोलेस्ट्रॉल वाढतं.
फुल क्रीम मिल्क
फुल क्रीम मिल्क कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतं. कारण यात फॅटचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्हाला ही समस्या आधीपासून असेल तर तुम्ही कमी फॅट असलेल्या दुधाचं सेवन केलं पाहिजे.
पॅक्ड ज्यूस
ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं आणि पॅक्ड फूडमध्ये तर अधिक जास्त असतं. अशात यांचं सेवन केल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल अधिक वाढतं.
सोडा ड्रिंक
असे बरेच ड्रिंक्स असतात ज्यांमध्ये सोडा जास्त असतो. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलपासून बचाव करायचा असेल तर हे ड्रिंक्स टाळले पाहिजे.
पाम ऑईल
डॉक्टरांनी सांगितलं की, पाम ऑईलमुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. जर तुम्ही याचं कोणत्याही प्रकारे सेवन करत असाल तर ते कमी करा.
दारू
दारू कोलेस्ट्रॉल वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. याने केवळ कोलेस्ट्रोलच वाढत नाही तर रक्तात ट्राइग्लिसराइड्स लेव्हलही वाढते. यामुळे अनेक अवयव डॅमेज होतात.
सोर्स लोकसत्ता