Saturday, May 11, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमनोज जरांगे पुण्यात दाखल, असा असेल आंदोलनाचा पुढचा प्रवास

मनोज जरांगे पुण्यात दाखल, असा असेल आंदोलनाचा पुढचा प्रवास

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. जालना, बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे (Pune) जिल्ह्यात दाखल झाले आहेत.तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला.

आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच करतील. दरम्यान, आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे.

पुढील तीन दिवसांचा दिनक्रम

23 जानेवारी
दुपारी भोजन – कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम – चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे

24 जानेवारी
पुणे शहर प्रवास – जगताप डेअरी – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
रात्री मुक्काम – लोणावळा

25 जानेवारी
दुपारी भोजन – पनवेल.
रात्री मुक्कामी – वाशी

26 जानेवारी
चेंबूर वरून पदयात्रा –
आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले. यावेळी दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. मात्र, त्यानंतर देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 20 जानेवारीपासून त्यांनी पायी दिंडी काढली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय