Saturday, May 18, 2024
HomeNewsभरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video.. नवरदेव लाजला, नवरीही स्तब्ध

भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video.. नवरदेव लाजला, नवरीही स्तब्ध

पुणे : लग्नाच्या आधी प्री-वेडिंग करण्याचे फॅड संपूर्ण देशामध्ये आलेल शहरी भागामध्ये हा प्रकार सर्रास चालतो. लग्नामध्ये भल्या मोठ्या स्क्रीन लावून हा प्री-वेडिंग चा व्हिडिओ सर्वांना दाखवला जातो

अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात प्री-वेडिंग दाखवलं जात होतं. पण प्री-वेडिंग दाखवताना भलताच व्हिडीओ दिसला, जो पाहून नवरा-नवरी दोघंही शॉक झालेत. नवरा-नवरीचा लग्नाआधीचा तो प्रायव्हेट व्हिडीओ सर्वांसमोर आला.

जो पाहून दोघांनाही लाज वाटली. लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरा-नवरीचा प्री-वेडिंगमधील जो सीन नको दिसायला हवा होता, तोच अचानक त्यांना दिसला, तोसुद्धा सर्वांसमोर त्यामुळे त्यांनाही शरम वाटली. नवरदेवाने तर अक्षरशः आपले डोळेच मिटून घेतले आणि नवरी तर ते दृश्य पाहून स्तब्ध झाली.

दोघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी मंडपात दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात वरमाला दिसत आहेत, म्हणजे लग्नाच्या काही विधी झाल्या आहेत. ते दोघं एकमेकांसोबत उभे आहेत.

इतक्या त्यांच्यासमोर असलेल्या एका मोठ्या स्क्रिनवर एक व्हिडीओ प्ले होतो. हा व्हिडीओ त्या दोघांच्या असतो. व्हिडीओ पाहून त्यांना धक्काच बसतो.कारण ते दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांना किस करताना दिसतात.

त्यांचा तो खासगी क्षण असा सर्वांसमोर येतो. त्यानंतर लग्नात आलेले सर्वजण पटापट आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढतात आणि वधू-वराचा हा खासगी क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागतात. हे पाहिल्यानंतर नवरदेवाचा चेहरा पाहा. त्याला राग आल्याचं आणि लाज वाटल्याचं दिसतं आहे.

https://www.instagram.com/reel/CqhW62zrqz6/?igshid=YzgwOTU0MGQ=


त्याने असं काहीतरी पाहण्यापेक्षा आपले डोळेच बंद करून घेतले. नवरीलाही जबर झटका बसल्याचं दिसतं. ते टकमक त्या व्हिडीओकडे पाहत राहते, कसं रिअॅक्ट व्हावं हे तिलाही समजत नाही आहे, ती तसंच व्हिडीओकडे पाहत स्तब्ध उभी आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी वधू-वरासोबत असं घडायला नको होतं, असं म्हटलं आहे. तर काही जणांनी याची मजा घेतली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय