Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi: शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शनास भाविकांची आळंदी मंदिरात गर्दी

Alandi: शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शनास भाविकांची आळंदी मंदिरात गर्दी

Alandi / अर्जुन मेदनकर : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री’चे राजबिंडे रूप शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी आळंदी मंदिरात परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे लक्षवेधी रूप पाहण्यासह व श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. (Alandi)

माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर चंदन उटी लेप लावून राम नवमी निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पुष्पसजावट करून श्रीचे वैभवी रूप साकारण्यात आले.

श्री नर्सीव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात श्रीक्षेत्रापाध्ये श्रीचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी व गांधी परिवाराने चंदनउटीतून परिश्रम पूर्वक श्रींचे वैभवी रूप साकारले.

दरम्यान आळंदी मंदिरात राम नवमी निमित्त देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ व्यवस्थापक माऊली वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे आदी उपस्थित होते. (Alandi)

आळंदी मंदिरात भाविकानी श्रीचे दर्शनास गर्दी केली. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे मंदिरात राम नवमीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले.

माउली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत रामजन्मोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. यात मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती,चोपदार यांचे वतीने गुढी पूजन झाले. चंदन उटी निमित्त भाविकांना श्रींचे पादुका दर्शन कारंजा मंडपात सुरु होते. उटी नंतर दर्शनास पंखा मंडपात सुरुवात झाली. यानंतर सहाचे सुमारास चंदन उटी दर्शन खुले झाले.

विना मंडपात मानकरी संतोष मोझे यांचे वतीने कीर्तन सेवा झाली. जन्मोत्सव कीर्तन-पाळणा, आरती, महानैवेद्य, सुंठवडा प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, मालक बाळासाहेब पवार, मानकरी आदी उपस्थित होते. दुपारी अडीच सुमारास श्रीनां वैभवी शिंदेशाही चंदन उटी निमित गाभारा भाविकांना दर्शनास बंद करून कारंजा मंडपात श्रीचे पादुका दर्शन सुरु करण्यात आले.

प्रथेप्रमाणे माऊलींचे संजीवन समाधीवर चंदन उटी तील शिंदेशाही पगडीतील वैभवी राजबिंडे आकर्षक रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट, फलार्पण करीत श्रीचे रूप लक्षवेधी राहिल्याने भाविकांनी आपल्या नेत्रात साठविले,

नित्यनैमित्तिक प्रवचन सेवा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने झाली. मानकरी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला. आवेकर-भावे श्री राम मंदिर संस्थांनचे वतीने उत्साहात श्री रामाची पालखी माऊली मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाली. श्री राम पालखीचे मंदिरात स्वागत करून नारळ प्रसाद देण्यात आला.

श्रीनां धुपारती झाल्यानंतर रात्री मानकरी संतोष मोझे यांचे वतीने जागर झाला. मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीचे चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, संजय लवांडे, संजय रणदिवे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले.

येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात श्रीराम नवमी निमित्त श्रीराम लल्ला लक्षवेधी अवतार श्री संत गोरोबा काकांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम पूर्वक अवतार साकार केला. आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत परंपरेने प्रसाद वाटप उत्साहात झाले.

आळंदीत रामजन्मोत्सव उत्साहात साजरा येथील आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानच्या श्री राम मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत राम नवमी वार्षिक उत्सव साजरा झाला. या निमित्त गुढी पाडवा ते राम नवमी या कालावधीत श्रीराम नवमी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

श्रीराम मंदिरात आकर्षक मोगऱ्याचे फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी श्रींच्या पूजा, अभिषेक नंतर. श्रीराम मंदिरात भाविकांनी पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा केला.

श्री राम मंदिरातील श्रींचे जन्मोत्सव सोहळ्याचे यशस्वीते साठी विश्वस्त संजय आवेकर, नितीन चोभे, सुनील भदे, गजानन काळे, रघुवीर ओक, तन्मय चोभे, नरहरी महाराज चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

उत्सवात सर्व कीर्तन सेवा वासुदेवबुवा बुरसे यांनी रुजू केली. यावेळी माजी विश्वस्त, आदी मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थ व रामभक्त युवक तरुणांचे वतीने भव्य श्रीरामरायांचे प्रतिमेची शोभायात्रेतून भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.

न्यू.अमरज्योत मित्र मंडळाचे वतीने कुऱ्हाडे आळीत श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. महाप्रसादास भाविकांनी गर्दी करून लाभ घेतला. मरकळ येथे श्रीगुरुदेवदत्त प्रतिष्ठान तर्फे रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मरकळ येथील श्री पंचलिंग श्रीगुदेवदत्त प्रतिष्ठानचे वतीने रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले, जन्मोत्सवावर आधारित पांडुरंग महाराज राजूरकर यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. श्री पंचलिंग श्रीगुरूदेवदत्त प्रतिष्ठान प्रमुख विश्वस्त ताई माऊली महाराज यांचे मार्गदर्शनाखाली राम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

यावेळी रामकृष्ण महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, आळंदी (Alandi) जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्टचे संचालक रोहिदास कदम, सचिन महाराज शिंदे, महादेव पाखरे, पुजारी देशपांडे महाराज, दिनकर महाराज तांबे आदी मान्यवरांसह वारकरी साधक, विद्यार्थी, मरकळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी


संबंधित लेख

लोकप्रिय