Tuesday, May 21, 2024
HomeNews"राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे धोरण राबवणार" - कृषीमंत्री अब्दुल सत्तार !

“राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे धोरण राबवणार” – कृषीमंत्री अब्दुल सत्तार !

राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे (poison free farming) धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.

त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीच्या सहाय्यानं भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असेही सत्तार म्हणाले. सेंद्रीय शेतीचं प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येईल असेही सत्तार यावेळी म्हणाले. नैसर्गिक शेतीच्या सहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं सत्तार म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीच्या विकासावर भर द्यावा लागेल, अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा लागेल असेही सत्तार म्हणाले. शेतकऱ्याला आर्थिक लाभाची हमी देणं गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल असेही ते म्हणाले. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या आहेत. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी नैसर्गिक शेतीची परिषद उपयुक्त ठरेल, असेही सत्तार यांनी सांगितले.

भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित करणार : फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


महाराष्ट्र राज्य फळे आणि भाजीपाला उत्पादनासह निर्यातीमध्ये देखील देशात अग्रेसर असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. राज्याचे स्वंतत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे. देशाच्या निर्यातीमध्ये 65 टक्के फळे, 50 टक्के भाजीपाल्याचा वाटा असून, यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं योगदान आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुधारित मनरेगा योजनेत घेण्यात आल्यामुळं फळ पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण वाढत असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय