Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगरम तव्यावर बसणाऱ्या बाबाचा शैतानी चेहरा आला समोर, महिलेचा केला...

गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाचा शैतानी चेहरा आला समोर, महिलेचा केला…

अमरावती : गेल्या काही वर्षात भोंदू बाबांचे प्रस्त चांगलेच पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अशिक्षितच नाही तर शिकले सवरलेले लोकंही या याला बळी पडताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वी असाच एक बावा अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध झाला होता. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. यामध्ये तो एका मोठ्या लोखंडी तव्यावर बसलेला दिसत होता. तर त्याचे भक्त या तव्याच्या खाली आग लावत होते. ह्याच बाबावर मध्य प्रदेश येथील एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

लैंगिक शोषण करुन चित्रफित बनवल्याचा आरोप


अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याने मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनविली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील 34 वर्षीय महिला 2 मे 2023 रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. तिने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली.

यादरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. लग्नाचेही अमिष दाखविले. एक दिवस महिलेला मोबाइलमध्ये त्याने केलेल्या क्रूकर्माची चित्रफीत दिसली. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून धमकावले. 2 जानेवारीला तिला नागपूरला सोडून तो फरार झाला.

आधी गाजला गरम तवा

काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने पसार झाला होता. यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला आहे. पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हाच त्याच्या मार्डी आश्रमातून कुऱ्हा पोलिसांनी अटक का केली नाही? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय