Friday, November 22, 2024
HomeNewsमूळ कर भरल्यावरच शास्ती माफ होईल-आयुक्त शेखर सिंह

मूळ कर भरल्यावरच शास्ती माफ होईल-आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:अवैध बांधकामांची शास्ती माफ झाल्याने नागरिकांनी आता स्वतःहून मूळ कराचा संपूर्ण भरणा 31 मार्चअखेर करून महापालिकेला सहकार्य करावे. यापुढे शहरात कुठलेही अवैध बांधकाम होणार नाही यासाठी महापालिकेकडून कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. तीन मार्चनंतर होणाऱ्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने शास्ती लागू राहणार आहे.असे शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व मिळकतकर संकलन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. मूळ कराची रक्कम भरल्यानंतरच शास्तीमाफीचे प्रमाणपत्र महापालिकेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.त्यानुसार संगणक प्रणालीत बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या बांधकामांना शास्ती माफ करण्याचा अध्यादेश शुक्रवारी राज्य सरकारकडून मिळाला आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 97,699 बांधकामांना फायदा होणार आहे.

शास्तीमाफीचा ‘जीआर’ नीट तपासला तरी एकूण अवैध बांधकामाचे नियमीतीकरण होईल याची खात्री देता येणार नाही. पिंपरी चिंचवड मनपाला मिळकतकराच्या मूळ कराची 240 कोटी रुपये आणि शास्तीसकट 660 कोटी रुपये बाकी येणेआहे.मूळ कर 240 कोटी वसूल करण्यासाठी प्रशासनाने हा आदेश दिला असल्याचे समजते. तसेच आदेशात शासकीय आदेशाच्यामहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 267 अ नुसार अवैध बांधकामांना आकारलेल्या अवैध बांधकामाना 2008 साली शास्तीकर लावण्यात आला होता.शास्ती माफ झाली म्हणजे सदर बांधकाम नियमित झाले असे समजण्यात येणार नाही.त्यामुळे 31 मार्च 2023 च्या आर्थिक वर्ष अखेरीनंतर शास्तीकर पुन्हा मानगुटीवर बसून राहील,असे तज्ज्ञांचे मत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय