Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यआझाद मैदान येथे परिचारिका संघटनेचे धरणे आंदोलन सुरू, 'या' तारखेपासून कामबंद आंदोलनाचा...

आझाद मैदान येथे परिचारिका संघटनेचे धरणे आंदोलन सुरू, ‘या’ तारखेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आज (दि.23) पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन 25 मे पर्यंत सुरू राहणार आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

1. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील ( शैक्षणिक व शुश्रूषा विभागातील ) १०० % पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती बाहयस्त्रोताद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करा.

2. केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भता नव्याने मंजूर करा, वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच असे संसर्गजन्य आजार उद्भवतात ज्यामुळे परिचारिकांना आपले प्राण गमवावे लागतात . म्हणून राज्यशासनाने त्यांचे फक्त शाब्दिक कौतुक न करता केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील सर्व परिचारिकांना सरसकट नियमितपणे नर्सिंग भता 7,200 रूपये प्रतिमहिना नव्याने मंजूर करून लागू करण्यात यावा. व इतर भत्ते सुद्धा केंद्र शासनाप्रमाणे मंजूर करून द्या.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

3. गणवेश भत्ते राज्यात वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक विभागात गेल्या 50 वर्षात परिचरिकांना मिळणाऱ्या भत्त्या मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. वर्षानुवर्षे केवळ 260 रूपये धुलाई भत्ता दिला जातो जो अत्यंत अपुरा आहे. केंद्रशासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांनाही गणवेश भता मंजूर करून देण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार व संयुक्तिक प्रस्ताव दाखल केलेला आहे. तरी गणवेश मता मंजूर करा.

4. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या वैयक्तिक, सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी व व्यवसायाच्या उन्नतीसाठी पदनामामध्ये बदल करा.

 5. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील, परिचारिका संवर्गातील पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्रशासनाप्रमाणे वेतनवाढी देण्यात याव्यात ( post basic Diploma – 1increment ; post basic graduation – Zincrement post basic post gradution 2incremenr , Mphi / P.H.D. – 2 incremengt )

पशुसंवर्धन विभागातील तब्बल ‘इतकी’ रिक्त पदे भरणार

6.  कोविड महामारीच्या काळात कोणत्याही सुट्ट्या न दिल्याने परिचारिका सातत्याने सेवा देत आहेत त्यांच्या अर्जित रजा ३०० पेक्षा जास्त झाल्यास रद्द केल्या जातात‌. त्या साठवण्याची व पुनः उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी. 

7. वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विनंती बदल्या गेल्या ३-४ वर्षात झालेल्या नाहीत. अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून इतर जिल्हयात सेवा देत आहेत. शासनाकडे विनंती बदली करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु बदली न झाल्यामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने त्यांची मानसिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियोजित विनंती बदल्या नियमित करण्यात याव्यात. तसेच परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीतून वगळण्यात यावे. सार्वजनिक विभागातील परिचारिकांच्या बदलीबाबत फक्त विनंती वर आधारित प्रशासकीय बदली हे धोरण अंगीकृत करण्यात करा. 

8. तज्ञ परिसेविकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कर्तव्य व जबाबदाऱ्या देण्यात याव्यात. दि .०१ / ० ९ / २०२१ चे नियमबाहय परिपत्रक रद्द करा. 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

9. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जुनी आहेत. परिचारिका अत्यावश्यक सेवा देतात. त्यामुळे परिचारिकांची निवासस्थाने राखीव ठेवण्यात यावीत किंवा नव्याने बांधून उपलब्ध करून देण्यात यावे. 

10. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयात पाळणाघर उपलब्ध करून देण्यात यावे. 

11. सार्वजनिक आरोग्य विभागात राज्य शुश्रूषा सेल स्थापन करा.

12. राज्यातील विद्यार्थी परिचारिका यांचे विद्यावेतन हे अत्यल्प असून, मागील १० वर्षाहून अधिक काळात यामध्ये वाढ केली गेली नाही. याबाबत शासनास वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून , त्याबाबत अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला नाही .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय