Monday, February 17, 2025

राज्यातील सर्वाधिक वयोवृद्ध वाघाचा मृत्यू !

 

चंद्रपूर :  सीनाळा जंगलात सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तो 17 वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते.

21 मे रोजी सिनाळा येथे एका गुराख्याचा मृत्यू झाला होता, तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सीनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

त्याचा मृत्यू वृध्दापकाळाने म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले होते.तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत, त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !

भूल भुलैया 2 चित्रपटाचा जलवा ; कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला !

राखी सावंत ने गुपचूप उरकली इंगेजमेंट ; कोण आहे तिचा बॉयफ्रेंड ?

Related Articles

- Advertisement -

Latest Articles