Thursday, April 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकामगार नेते काशिनाथ नखाते हल्ला प्रकरण : पुरोगामी संघटनांची तीव्र निदर्शने

कामगार नेते काशिनाथ नखाते हल्ला प्रकरण : पुरोगामी संघटनांची तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवड : कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यावर त्यांच्या चिंचवड येथील कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला. आरोपी कृष्णानगर, चिंचवड परिसरातील गुन्हेगार असल्याचे समजते. या ठिकाणी पथारीवाले, फेरीवाले असंघटित व्यावसायिकांकडून हप्ते गोळा केले जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. काशिनाथ नखाते या खंडणीखोर हप्तेबजाविरोधात आणि श्रमिक व्यावसायिकांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी लढा देत आहेत, त्यामुळे नाराज असलेल्या असामाजिक गटाकडून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात गंभीर दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संतप्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, हॉकर्स फेडरेशन या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दळवीनगर येथे निदर्शने केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने दळवीनगर चिंचवड येथे पोलीस आयुक्त कार्यलयावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला. मात्र आंदोलकांनी रस्त्यावर गुंडगिरीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करून पोलिसा विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व मानव कांबळे, मारुती भापकर, सतीश काळे, धनाजी येळकर, प्रताप गुरव, अशोक मगर, गणेश दराडे यांनी केले.

अखेर अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी सदर हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात येईल. कामगार नेत्यावर झालेला हल्ला याची दखल घेण्यात येत आहे, असे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी शिष्टमंडळास दिले आहे. पोलीस योग्य ती कडक कारवाई करतील असे मानव कांबळे म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, छावा युवा संघटना, डी वाय एफ आय. अ. भा.जनवादी महिला संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बारा बलुतेदार संघटना ई संघटना सामील झाल्या होत्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुढाऱ्यांनो भाषणांना आवर घाला….लग्न समारंभात शुभ आशीर्वाद लांबतोय

पोलिसांनी हल्लेखोर गुंडांना अटक करावी – कॉम्रेड गणेश दराडे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात श्रमिक चळवळीतील संघटनांच्या कार्यालयात घुसून गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तीला कोण पाठीशी घालत आहे? असा सवाल केला. शहरात श्रमिक संघटनांच्या कार्यालयावर हल्ले होता कामा नयेत, पोलिसांनी हल्लेखोर गुंडांना अटक करावी. माकपच्या आकुर्डी येथील कार्यलयावर असाच भ्याड प्रयत्न करण्यात आला होता याचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा. अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करत आहे, असेही ते म्हणाले.

खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करा – चेतन बेंद्रे 

आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे म्हणाले, शहरात बाहेरील राज्यातून आणि जिल्ह्यातून आलेल्या गोरगरीब पथविक्रेते, फेरीवाले पोट भरण्यासाठी व्यवसाय करत आहेत. त्यांना अतिक्रमण कारवाईने आधीच परेशान केले आहे. हप्ता वसुली करणारे गुंड हे खंडणीखोर आहेत. काशिनाथ नखाते यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. खंडणी वसुली चे गुन्हे पोलिसांनी गुंडावर दाखल करावेत.

कष्टकऱ्यांची चळवळ दडपण्यासाठी गुंडाचा हल्ला – अपर्णा दराडे 

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे म्हणाल्या, श्रमिकांची चळवळ दडपण्यासाठी केलेला हा हल्ला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडून सूत्रधार शोधून काढावेत. शहरातील हप्तेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे.

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

बेरोजगार युवकांना खंडणी गोळा करायला लावले जाते – सचिन देसाई

डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिन देसाई म्हणाले, पथविक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्याकडून खंडणी, हप्ते वसूल करण्यासाठी नियोजन बंध पद्धतीने असामाजिक गट कार्य करत आहेत. त्यासाठी बेरोजगार युवकांना वापरले जात आहेत. यातून कामगार नेत्यावर होणारे हल्ले शहराच्या श्रमिक चळवळीला धाक दाखवण्यासाठी केले जात आहेत.

शहरात गुंडाचे मनोबल वाढत आहे – बाबा कांबळे

कष्टकरी कामगार पंचायत चे बाबा कांबळे, पिंपरी चिंचवड शहरात कामगार चळवळीच्या नेत्यावर दबाव दहशत टाकण्यासाठी चळवळी मोडून काढण्यासाठी गुंडाचा वापर केला जात आहे. गुंडाचे मनोबल वाढत आहे.काशिनाथ नखाते यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.

महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू, असा करू शकता अर्ज !

कामगार नेत्यावरील हल्ला धक्कादायक – अशोक मगर

सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर म्हणाले, औद्योगिक नगरीत मोठी श्रमिक चळवळ आहे. चळवळीतील नेते शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन कष्टकऱ्यांना न्याय देत आहेत. त्यांच्या कार्यलयात घुसून नेत्यावर हल्ले करणारे लोक लोकशाहीचे भक्षक आहेत. गुंडावर कारवाई करून कामगार नेत्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे.

क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय