Monday, May 20, 2024
Homeराजकारणस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केली ‘ही’ घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केली ‘ही’ घोषणा

मुंबई : राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे. या निवडणूका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सह अनेक पक्ष आग्रही आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यात नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर झाल्याने आम्हाला धक्का बसला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बांठीया समितीने त्यांचे काम पूर्ण करून दिल्यानंतर आता होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होण्याची गरज आहे, अशी पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. जर या निवडणुका ओबीसी आरक्षणासहीत होत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सर्व ठिकाणी २७ टक्के जागांवर ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय