Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड‘दि केरला स्टोरी’चा पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मोफत शो’

‘दि केरला स्टोरी’चा पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मोफत शो’

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे केले आवाहन

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर
: धर्मांतरावर आधारित ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत.यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे केले आवाहन त्यांनी केले आहे. चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. सिनेमागृहात गुरूवारी दि.११ मे रोजी ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शोचे नियोजन केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन असून, चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह आहेत, यांनी दाखवलेली हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांच्या चिंतन करायला लावणारी आहे. समाजप्रबोधनाचा भाग म्हणून आमदार लांडगे यांनी या चित्रपटाचे तीन शो मोफत आयोजित केले आहेत.

आमदार लांडगे म्हणाले की, धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता- भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात, अशी आमची भावना आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर या लग्नाचे आमीष, प्रेमाचे आमीष किंवा नोकरीचे आमीष दाखवून मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात. ही बाब समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे.आळंदीत एक धर्मांतराचा प्रकार आम्ही उधळून लावला होता. आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आम्ही हा शो मोफत ठेवला आहे.असे महेश लांडगे,शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय