जुन्नर : जुन्नरमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात आज (दि.१८) ५० कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर एक रुग्णांचा मृत्यू झाला.
यामध्ये हिवरे तर्फे ना. गाव ३, नारायणगाव ११, ओतुर ६, आळे ५, अजनावळे ४, माणकेश्वर ३, राजुरी २, उदापुर २, तेजेवाडी २, पिंपळगाव तर्फे ना.गाव १, खोडद १, ओझर १, आर्वी १, बल्लाळवाडी १, हिवरे खु १, उंब्रज नं.२- १, वडगाव आनंद १, जुन्नर नगर पालिका ४ समावेश आहे.
तर मागील २४ तासात हिवरे खु १ येथील ६० वर्षीय एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ७२० झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार १४८ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६३ असून सध्या तालुक्यात ३०९ ऍक्टिव कोरोना रुग्ण आहेत.