Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची स्थिती उघड करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांना रुग्णालयात पुरेशा सुविधांचा अभाव असल्यामुळे भर थंडीत जमिनीवर झोपवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
रुग्णालयात शुक्रवारी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर या महिलांना रुग्णालयात विश्रांतीसाठी कॉट उपलब्ध नव्हत्या. परिणामी, महिलांना थंडीच्या कठोर परिस्थितीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या स्वच्छतेकडेही योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला आहे.
नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आक्षेप घेत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महिलांच्या जीवाशी खेळ केला जात असून, त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जात नाही,” असे नागरिकांनी म्हटले आहे.
ग्रामीण रुग्णालयांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे टार्गेट दिले जात असले तरी पुरेशा साहित्याची उपलब्धता नसल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. यामुळे महिलांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.
Hingoli


हे ही वाचा :
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास