Friday, November 22, 2024
Homeजिल्हादेशातील सर्वात पहिली सरकारी मालिकेची टॅक्सी सेवा केरळात

देशातील सर्वात पहिली सरकारी मालिकेची टॅक्सी सेवा केरळात

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा एक अधिकार असलेल्या ऑनलाइन टॅक्सी सेवा क्षेत्रात स्पर्धा करण्यासाठी केरळ राज्य सरकार सज्ज झाले असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देशातील पहिल्या सरकारी मालकीच्या ऑनलाईन ऑटो टॅक्सी सेवा ‘केरळ सवारीचे’ उद्घाटन केले. नव उदारीकरण धोरणे आपल्या पारंपारिक कामगार क्षेत्रावर आणि कामगारांवर अत्यंत नकारात्मक परिणाम करत असताना मोटार कामगारांना उत्पन्नाचे शोषण न होणारे स्त्रोत सुनिश्चित करण्यासाठी कामगार विभागाने केरळा सवारी या एका प्रकल्पाचा विचार केला आणि त्यानंतर त्यावर अंमलबजावणी केली .असे केरळचे कामगार मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी यावेळी सांगितले.

हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर तिरुवनंतपुरम पालिकेत राबवण्यात येणार आहे .नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल. असे शिवणकुट्टी यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा हे केरळ सवारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक चालकाला पोलीस मंजुरी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी केरळ सवार्‍यांमध्ये पॅनिक बटन प्रणाली असणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय