मुंबई : सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाचे vfx वरून प्रेक्षक निर्मात्यांवर नाराज झाले होते.
वास्तविकता या चित्रपटाचे बजेट पाहता चित्रपटातील तांत्रिक बाबींवर जास्त खर्च होणे अपेक्षित होतं, मात्र नायक आणि इतर स्टारकास्ट त्यांच्या मंधनामुळे मूळे हा चित्रपट महाग झाला आहे. त्यानंतर मध्यंतरी ट्रेलर पाहून परिस्थिती जरा सुधारली आणि लोकांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. पण अगदी सकाळी लवकर उठून चित्रपटाला गेलेल्या आणि गर्दी करून आदिपुरुष पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.
चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे. आता चित्रपटातील हनुमानाचे संवादही समोर आले आहे. हनुमनाच्या तोंडी असे छपरी डायलॉग का घातले म्हणून प्रेक्षकांनी निर्मात्यांना चांगलेच धारेवर धरले आहेत. या चित्रपटातील हनुमनाच्या संवादावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. हनुमानाचे संवाद हे राम कथेला शोभा देणारे नाही असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे.
चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले सामान्य भाषेतील संवाद ऐकून प्रेक्षकांना राग अनावर झाला आहे. सोशल मीडियाद्वारे या संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे. ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..” असा संवाद हनुमानाच्या तोंडी आहे. हा संवाद ऐकून प्रेक्षकांनी अक्षरशः संताप व्यक्त केला आहे. हनुमानाचा असा संवाद कसा काय असू शकतो?, तो हनुमान आहे कुणी छपरी नाही.., देवाच्या तोंडी असे डायलॉग देताना किमान देवाला तरी घाबरा.. अशा शब्दात प्रेक्षकांनी समाचार घेतला आहे.