हाताला काम नाही आणि रोजगार गेला म्हणून आत्महत्या चे प्रमाण वाढल्याचा आरोप
पिंपरी : कोरोना संकटामुळे रोजगार आणि आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. देशभरामध्ये ३० कोटी लोकांवर हा मोठा परिणाम झाला आणी ते बेरोजगार झाले. या कालावधीमध्ये अनेकांच्या हातचे काम केले. अशातच केंद्रीय श्रम मंत्री भूपेन्द्र यादव मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या सर्वेक्षणात सुमारे दोन लाख लोकांना काम मिळाल्याचे जाहीर केले. हे म्हणजे एक तर काम मिळत नाही, मिळाले तर टिकत नाही अशा स्थितीमध्ये न मिळालेल्या लोकाला काम मिळाल्याचे भासवून कामच्या शोधात आणि आधीच विवंचनेत असणाऱ्या कामगारांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
हेही वाचा ! पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळे बंद – जमावबंदीचा आदेश जारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक कष्टकरी कामगारांचे हातचे काम गेले, म्हणून विविध ठिकाणी आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. नुकतेच दत्ता शंकर पूशीलकर रा. कुंभारवाडा मुंढवा यांनी दोन वर्षापासून हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीमुळे त्याने रविवारी रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली,असे अनेक उदहारणे देता येतील, असेही म्हटले आहे.
एप्रिल – मे २०२० मध्ये केंद्र सरकारने परिपत्रक काढले होते की कामगार आणि श्रमिक कामगार ज्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलेला आहे. कोरोना कालावधीतील त्यांचा त्यांना पगार देण्यात यावा, असे बंधन घातले. मात्र या दरम्यान अनेक कंपन्या एकत्र येऊन यास विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारने माघार घेतली आणि पगार मिळेल, या आशेवर बसलेल्या कामगारांची फसवणूक केली.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ हे आश्वासन हवेतच विरले आहे. अशा प्रकारच्या दिशाभूल करण्याचे काम केंद्र सरकारने वारंवार केले आहे.
हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर
अजूनही कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचा हातचे काम गेले, अशानां अजुनही काम मिळाले नाही, पगार मिळेल आणि आपल्याला आर्थिक लाभ होईल असं म्हणून अनेक जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाकडे फिरत आहेत आणि केंद्राकडे आस लावून बसलेल्या या सर्वांची घोर निराशा झालेली आहे. याबाबत केंद्राने जाणीवपूर्वक विचार करून त्यांना त्यांचा पगार मिळवून देण्याची गरज असल्याचे मतही नखाते यांनी व्यक्त केले.
– क्रांतिकुमार कडुलकर
हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा
हेही वाचा ! प्राध्यापकांसाठी खुशखबर ! ‘या’ महाविद्यालयातील पदे भरणार, राज्य सरकारचा निर्णय !
हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा