Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाश्रमिक हक्क आंदोलन कामगार युनियन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न 

श्रमिक हक्क आंदोलन कामगार युनियन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न 

पुणे / आनंद कांबळे : नाका मजूर एकता मंच म्हणून येरवडा नाक्यावरून सुरू झालेला हा प्रवास 4 मार्च 2022 मध्ये ’श्रमिक हक्क आंदोलन’ या नोंदणीकृत कामगार युनियनच्या रुपात उतरून एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी श्रमिक भवन, महानगरपालिका पुणे येथे वारजे, कोथरूड व येरवडा आशा तिन्ही वस्त्यांवरच्या बांधकाम कामगरांनी एकत्र येत उत्साहात साजरी केला.

कार्यक्रमाची सुरुवात नव सांस्कृतिक पर्याय टीम ने लिहिलेल्या लाचार बनू नको या गाण्याचे करण्यात आली. मराठी व बंजारा या दोन्ही भाषांमध्ये हे गाणे गायले गेले. त्यानंतर संघटनेच्या स्थापने पर्यंतचा प्रवास व्हिडिओ तसेच फोटोज च्या माध्यमातून माहितीपट मांडण्यात आला. 

युनियन च्या माध्यमातून मागील 15 दिवसांपासून प्रत्येक वस्तीवर कामगारांच्या ग्रुप मिटिंग व त्या माध्यमातून जो कृती कार्यक्रम आखला गेला होता. तो थोडक्यात येरवडा कमिटी मेम्बर व संघटनेचे सचिव जगदीश राठोड, वारजे कमिटी प्रतिनिधी बालाजी झुकझुके यांनी 2 दिवसाचा कृती कार्यक्रम व त्याचे महत्व मांडला. 

संघटना कामगारांच्या माध्यमातून कशी चालते याची थोडक्यात माहिती कोथरूड प्रतिनिधी रवी पवार व येरवडा प्रतिनिधी अकबर खान यांनी संघटना प्रत्येक्षात कामगार कशी चालवतात त्यातील कमिटी प्रतिनिधी च्या कामाची पद्धती तसेच केंद्रीय समिती कशाप्रकारे निर्णय घेते या गोष्टी मांडल्या. श्रमिक हक्क आंदोलन ही कामगार चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणारी संघटना असल्याने मागील वर्षात कामगरांना शासकीय फायद्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण सन्मानाने जगणं, आपणास जगण्याचा आनंद घेण्याचा अधिकार आहे व त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी यावर संघटनेने केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा कोथरूड प्रतिनिधी यल्लमा गुलाशेठी व येरवडा प्रतिनिधी शिवाजी पडवळं यांनी मांडला. यामध्ये सहल, शिबिर, महिला मिटिंग तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगरांना देखील त्यांची पर्यायी आनंद घेण्याच्या पद्धती रुजवल्या आहेत याविषयी त्यांनी सांगितले. 

श्रमिक हक्क आंदोलन ही कामगारांच्या मुलांमध्ये देखील कार्यरत असते त्यामुळे कामगारांची मुले मोठ्याप्रमाणात वेगवेगळ्या इतर सांस्कृतिक कृती कार्यक्रमात सहभागी झाले होते. आशा 27 मुलांना त्यांच्या सहभागाबद्दल संघटनेतून गौरविण्यात आले. त्या पैकी येरवडा व वारजे वस्तीवरील मुलांनी दोन लोकगीतांवर नृत्य सादर केले. तसेच कोथरूड वस्तीच्या कमिटी प्रतिनिधी, कामगार व त्यांच्या मुलांनी कामगार एकजुटी ची गरज या विषयावर एक छोटं पथनाट्य सादर केले. 

यानंतर संघटनेला लाभले आजचे पाहुणे कॉ.चंद्रकांत तिवारी, विलास किरोते, ॲड. भवार वकील, श्रुती तांबे व शैलजा आरळकर यांच्या हस्ते संघटनेचा पेपर नव पर्याय च्या 15 व्या अंकाचे अनावरण करण्यात आले. आलेल्या सर्व पाहुण्यांनी कामगरांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आज एकत्र येऊन लढण्याची व संघर्ष तीव्र करण्याची गरज आहे असे संबोधित केले. 

श्रमिक हक्क आंदोलन चे सरचिटणीस सागर सविता धनराज यांनी संघटनेची पुढील दिशा त्याचा पुढील कृती कार्यक्रम तसेच शिक्षण, आरोग्य, नाक्यावर शेड बनवण्याचा मुद्दयावर संघटना जोरदारपणे काम करणार आहे तसेच कामगारांच्या मदत निधी व कष्टकरी अभ्यास मंडळाचा मुद्दा मांडला. शेवटी दोस्ती झिंदाबाद क्रांती जिंदाबाद या गाण्याने व घोषणाबाजी करत नव सांस्कृतिक पर्याय च्या टीम ने शेवट केला.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय