पदयात्रा,भेटीगाठी,बैठकी द्वारे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांची जंगी प्रचार मोहिम
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: महापालिकेमध्ये भाजपची पाच वर्षे सत्ता होती. मात्र, पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने मोठा भ्रष्टाचार केला आहे. भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर यायला हवा. लाचखोरी, खंडणी आणि भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपला धडा शिकवा,महापालिकेतील भाजपची सत्ता आल्यापासून पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांमध्ये नो वॉटर नो वोट, असे बॅनर लावण्यात आलेले आहेत.शहराचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी जनतेने मला पाठिंबा देऊन विजयी करावे,असे ,असे आवाहन नाना काटे यांनी मतदारांना केले आहे.
चिंचवड येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील क्रांतीनगर, काशीद वस्ती,जवळकर नगर,भैरवनाथ नगर,आनंद नगर,अनंत नगर, प्रभात नगर, वैदु वस्ती, लक्ष्मी नगर, पिंपरी गुरव गावठाण, वेस्ट साईड काऊंटी, भालेकर नगर, अमृता कॉलनी, भाऊ नगर, शिवनेरी कॉलनी, काशीद नगर, देवकर पार्क, सुवर्ण पार्क आदी ठिकाणी नाना काटे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआयसह इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. ठिकठिकाणी माता-भगिनी नाना काटे यांचे औक्षण करत होत्या.
आदित्य ठाकरे,अजित पवार,नाना पटोले यांनी वाल्हेकरवाडी येथील मेळाव्यात केलेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.