Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतळवडे:त्रिवेणीनगर स्पाईन रोड बाधित राहिवाश्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी साखळी उपोषण आंदोलन

तळवडे:त्रिवेणीनगर स्पाईन रोड बाधित राहिवाश्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी साखळी उपोषण आंदोलन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर :-तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रोडच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.हे बाधित रहिवाशी १३ एप्रिल २०२३ पासून स्पाईन रोड येथील राम मंदिराच्या जवळ उपोषणास बसले आहेत.स्पाईन रोडच्या रुंदीकरणात १३२ रहिवाश्यांची घरे बाधित झाली आहेत. या बाधित कुटूंबांना महापालिका प्रशासनाकडून मोशी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ११ येथे भूखंड मंजूर करण्यात आलेले आहेत.

पण येथील बाधित कुटुंबे ही मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांना नवीन बांधकामाचा खर्च हा परवडण्याजोगा नाही. यासाठी महापालिकेने बाधितांच्या नवीन बांधकामाची किंमत ठरवून ती रक्कम बाधितांना द्यावी. तसेच नवीन पाणी व वीज जोडणी शुल्क ही माफ करावे.जोडीला बांधकाम करताना प्लॅन पासचा खर्च ही माफ करावा,अशी मागणी त्रिवेणीनगर स्पाईन रोड संघर्ष कृती समितीचे समन्वयक निलेश किसन चौरे यांनी केली आहे, ते आम्ही आमच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. पण महापालिका प्रशासनाकडून आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळेच आम्ही बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जर आमच्या मागण्यांना प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.तर आम्ही आमचे आंदोलन आणखी तीव्र करू.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश किसन चौरे आणि सामाजिक कार्यकर्ते अतिश अशोक जाधव या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देताना म्हणाले की,प्रशासनाने बाधित राहिवाश्यांना लीजडिड करून घ्यावे,मागील ९ वर्षांपासून यांची घरे स्पाईन रोड विस्तारात गेली आहेत,ते बेघर लोक भाडे भरून थकली आहेत,त्यांना भाडे देऊन लाईट,पाणी मोफत द्यावे.रस्ते बाधित राहिवाश्यांना २०१३ च्या शासन अध्यादेशानुसार पुनर्वसन करण्यात यावे.

साखळी उपोषण आंदोलनातील रहिवाशी रामदास निर्वाण म्हणाले की,ज्या बाधितांचे जास्त भुखंड व जास्त बांधकाम असेल त्यांना अतिरिक्त योग्य मोबदला मिळावा व बांधकामाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रचलित पध्दतीने भाडे हे बाधित रहिवाश्यांना मिळावे.रामदास निर्वाण,विवेक वाघधरे,अशोक जाधव,राजेंद्र अग्रवाल,विजय चिंचोलकर, नवीन भालेकर, किसन चौरे सह समितीचे बाधित रहिवासी उपोषणात सहभागी झाले आहेत.

दिलीप घोडेकर-उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई,केसरीनाथ पाटील-भोसरी विधानसभा संपर्क प्रमुख,निलेश मुटके ,दादा नरळे आदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

नवीन भालेकर,रामदास निर्वाण,विवेक वाघधरे,अशोक जाधव,राजेंद्र अग्रवाल,विजय चिंचोलकर, किसन चौरे, गोरख भालेकर,अमित फाळके,संदीप वाल्मीक,सोमेश काणेकर हे बाधित रहिवाशी या उपोषणात अग्रक्रमाने सहभागी झालेले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय