सुरगाणा (दौलत चौधरी) : शहरात कडक निर्बंध चालू असताना देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गुरूवारी सुरगाणा तहसिल पोलिस आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून ह्या कारवाई ला सुरुवात करण्यात आली. एकीकडे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली असली तरी नागरिकांची वर्दळ मात्र कायम सुरू असल्याने सुरगाणा तहसिल पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
“शहरात जनता कर्फ्यु हा स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येत आहे.व्यावसायिकांनीही जनता कर्फ्यु ला साथ देत दुकाने बंद ठेवली आहेत.असे असताना विनाकारण कोणीही फिरू नये.अन्यथा कारवाई केली जाईल.”
-निलेश बोडके,
सहाय्यक पोलिस निरीक्षक, सुरगाणा
“सुरगाणा शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरू नये.विनाकारण फिरल्यास कारवाई करून सदर व्यक्तीची रॅपिड टेस्ट केली जाईल.दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
– डॉ. सचिन पटेल,
मुख्याधिकारी, सुरगाणा नगरपंचायत