केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुरुवार, १५ एप्रिल २०२१ रोजी यूपीएससी सीएपीएफ परीक्षा २०२१ ची अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय पोलीस बल (CAPF) असिस्टेंट कमांडंट्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार, यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात.
यूपीएससी भरती २०२१ च्या माध्यमातून सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) मध्ये सहायक कमांडंट (ग्रुप ए) च्या एकूण १५९ पदे भरली जाणार आहेत. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२१ आहे.
पदांचा तपशील –
सीमा सुरक्षा बल (BSF) – ३५ पदे
केंद्रीय राखील पोलीस बल (CRPF) – ३६ पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) – ६७ पदे
भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) – २० पदे
सशस्त्र सीमा बल (SSB) – १ पद
पदांची एकूण संख्या – १५९
महत्त्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १५ एप्रिल २०२१
अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख : ५ मे २०२१
अॅप्लिकेशन मागे घेण्याची तारीख : १२ मे ते १८ मे २०२१
लेखी परीक्षेची तारीख : ८ ऑगस्ट २०२१
आवश्यक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. याव्यतिरिक्त उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षांपर्यंत असावे.
अर्ज शुल्क –
एससी, एसटी प्रवर्ग आणि महिला उमेदवार वगळता सर्व उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क २०० रुपये आहे. अर्जाचे शुल्क भारतीय स्टेट कोणत्याही शाखेत पेमेंट करून किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा उपयोग करून किंवा एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून भरता येईल.
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक दक्षता परीक्षा (PET), शारीरिक मानक परीक्षा (PST), मेडिकल टेस्ट आणि इंटरव्यू/पर्सनालिटी टेस्टच्या आधारे केली जाईल. मात्र उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टच्या माध्यमातून होईल.