मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलली. यामध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नामांतरावरून आरोप – प्रत्यारोप देखील करण्यात आले. या सोबतच औरंगाबाद शहराच्या नामकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
औरंगाबाद शहराच्या नामकरणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर असताना या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. कोर्टाने सांगितले की, कोणत्याही शहर, रस्त्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा संपूर्णपणे लोकनियुक्त सरकारचा आहे. असे सांगत छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी फेटाळल्याने राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.