Sunday, December 8, 2024
HomeNewsमैत्रिणीला गोळी झाडून, स्वतः ट्रक खाली उडी मारून मुंबईतील युवकाची आत्महत्या !

मैत्रिणीला गोळी झाडून, स्वतः ट्रक खाली उडी मारून मुंबईतील युवकाची आत्महत्या !

बोईसर परिसरात (Boisar Crime Murder) एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचं तपासात उघड झालं असून बोईसरमधील (Boisar News) टीमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा डोक्याला गोळी लागल्याने मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) समोर आले असून भरदिवसा आरोपीनं तरुणीच्या डोक्यात पाठीमागून येत गोळी घातल्याचं यात दिसत आहे.

गोळीबार करुन पळून जाण्याचा तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला. मात्र आरोपीने सीआयएसएफच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सीआयएसएफच्या गाडीखाली आल्याने जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.


बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी आणि मयत मुलगी यांचं प्रेम प्रकरण होतं. मयत मुलीच्या कुटुंबियांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मयत मुलीच्या आईकडून देण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय