Friday, November 22, 2024
HomeAkoleकिसान सभेच्या राजूर मुक्काम आंदोलनाची यशस्वी सांगता

किसान सभेच्या राजूर मुक्काम आंदोलनाची यशस्वी सांगता

अकोले : राजूर येथे हिरडा, पाणी, वीज व बुडीत बंधारे प्रश्नी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची आज पाचव्या दिवशी यशस्वी सांगता झाली. बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू केली जाईल. राजूर, कोतुळ व शेंडी येथे स्वतंत्र हिरडा बाजार सुरू करण्यात येईल. 15 फेब्रुवारी पर्यंत बाळ हिरडा आधारभाव जाहीर केले जाईल असे यावेळी मान्य करण्यात आले. 

 आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी याबाबत लेखी दिले. भंडारदरा धरणातील पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यात येतील, यासाठीचा सर्वेक्षण प्रस्ताव तयार झाला असून याबाबतची प्रस्ताव प्रत किसान सभेला सादर करण्यात आली. आदिवासी भागातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले. 

वाड्यावस्त्यांचे रस्ते, वीज, पिण्याचे पाणी याविषयी मागण्या मार्गी लावण्यात आल्या मागणी मार्गी लावण्यासाठी यावेळी आंदोलनस्थळी झालेल्या बैठकीत तालुक्याचे तहसीलदार सतीश थेटे, बीडीओ कोल्हे, आदिवासी प्रकल्प अधिकारी राजन पाटील आदिवासी विकास सोसायटीचे राहुल पाटील, राजूर गावाच्या सरपंच पुष्पाताई निगळे, पोलीस निरीक्षक प्रवण दात्रे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेऊन मागण्या मान्य केल्या. 

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, भीमा मुठे, सतीश भांगरे, स्वप्नील धांडे, ओंकार नवाळी, डॉ.संदीप कडलग, गणपत मधे, कुसा मधे, वसंत वाघ, बहिरू रेंगडे, संदीप दराडे, लक्ष्मण घोडे, मारुती बांगर, अर्जुन गंभीरे, शिवराम लहामटे, सोमनाथ धिंदळे, नाथा बहुरले यांनी चर्चेत भाग घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय