मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आणि मुलींसाठी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवात लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. (CM Scheme for Youth)
या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला ८ हजार रुपये, तर पदवीधर तरुणांना दर महिन्याला १० हजार रुपये मिळतील. या तरुणांना वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्यावर आधारित नोकरी मिळवणे सोपे होईल. (CM Scheme for Youth)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आपले सरकार कुशल कामगार तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपल्या तरुणांना त्यांच्या कामात कुशल व्हावे यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे.”
लाडकी बहीण योजना जाहीर करताना विरोधकांनी ‘भावांसाठी कोणती योजना का नाही?’ असा सवाल उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर लाडका भाऊ योजनेची घोषणा करून मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, वर्षाला १८ हजार रुपये आणि दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
CM Scheme for Youth
हेही वाचा :
मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश
बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव ! मुंबईत 600 लोडर्स पदासाठी तब्बल 25,000 तरूणांची गर्दी
मोठी बातमी : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ
केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर
कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती
IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती
मेगा भरती : मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास