Saturday, November 2, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार...

मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील (PCMC) अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. दादा गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र आता अनेक पदाधीकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनाम्यांची प्रत खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत या सर्वांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक उपस्थित होते. (PCMC)

पिंपरी चिंचवडमधील (PCMC) या नेत्यांनी केला शरद पवारांच्या गटात प्रवेश:

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल जाधव तसेच हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, पंकज भालेकर, समीर वाबळे, गीता मंचरकर, वैशाली उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, वसंत बोऱ्हाटे, संजय नेवाळे, प्रवीण भालेकर या सर्व माजी नगरसेवकांसह रवींद्र सोनवणे – (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे), यश साने – पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने, निवृत्ती शिंदे – माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ यांनी

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव ! मुंबईत 600 लोडर्स पदासाठी तब्बल 25,000 तरूणांची गर्दी

मोठी बातमी : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ

केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

Nagpur : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 97 जागांसाठी भरती

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

संबंधित लेख

लोकप्रिय