Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरस्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) जुन्नर तालुका समितीचे २० वे अधिवेशन संपन्न

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) जुन्नर तालुका समितीचे २० वे अधिवेशन संपन्न

जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जुन्नर तालुका समितीचे २० वे तालुका आधिवेशन आज दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी MSEB कार्यालय जुन्नर याठिकाणी पार पडले.

सकाळी ११:०० संघटनेचा ध्वज फडकवून अधिवेशनाला सर्वात करण्यात आली. उद्घाटक सत्रामध्ये प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कसबे सर यांनी उद्घाटक सत्रामध्ये बोलताना नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कसे घातक आहे. तसेच त्याचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल हे सांगितले. तसेच उद्घाटन सत्रामध्ये युवा नेते संजय साबळे, एसएफआय महाराष्ट्र राज्य सहसचिव विलास साबळे व जिल्हा समिती सचिव नवनाथ मोरे यांनी आपली मते मांडली. तसेच यावेळी एसएफआय चे जिल्हा अधिवेशन १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी घोडेगाव येथे संपन्न होत आहे. त्या अधिवेशनाच्या लोगो चे अनावरण करण्यात आले.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन निशा साबळे यांनी केले व प्रास्ताविक अक्षय घोडे यांनी केले तर उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान अक्षय साबळे यांनी भूषविले.

यानंतर आधिवेशन सत्रात वार्षिक अहवालाचे वाचन करून संघटनेच्या कामजोऱ्या व संघटनेची बलस्थाने यावर मंथन करण्यात आले. तसेच पुढील काळात कोणकोणत्या प्रश्नांवर काम करायचे यासाठी.१) स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा तीव्र करा २) वस्तीगृह प्रश्नाच्या विरोधी लढा तीव्र करा ३) सरकारी शाळा बळकट करण्यासाठी दत्तक शाळा योजना व समूह शाळांच्या विरोधातील लढा तीव्र करा. व ४) शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याना शून्य शुल्क प्रवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लढा तीव्र करा हे ४ ठराव सभागृहात मांडून यावर एकमताने मान्यता घेण्यात आली. त्यानंतर नवीन कमिटीचा प्रस्ताव आधिवेशनात मांडून त्यावर एकमताने मान्यता घेऊन तालुक्याची पुढील तालुका कमिटी नेमण्यात आली.

यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सूरज बांबळे तर सचिव म्हणून अक्षय घोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून वृषाली दाभाडे व रवींद्र बुळे, सहसचिव म्हणून अंकिता मांडवे व भूषण पोफळे, कोषाध्यक्ष म्हणून अक्षय साबळे व सदस्य म्हणून संजना हिले, मयुरी उतळे, उज्वला जंगले, सुप्रिया माळी, ऋषली साबळे, साहील जोशी, स्वामी गवारी, विनायक इरणक, ऋषिकेश कचरे, अमोल गभाले, प्रज्वल करवंदे, विष्णू भांगरे, यांची तालुका समितीचे पदाधिकारी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

या आधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी आखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, आखिल भारतीय किसान सभा जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, शेतकरी शेतमजूर, कामगारांचे नेते गणपत घोडे, CITU कामगार संघटनेचे मोहन पोटे, SFI पुणे जिल्हा सदस्य राजू शेळके, माजी कार्यकर्ते किरण हिले, दादाभाऊ साबळे इ.उपस्थितीत होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय