Friday, May 3, 2024
Homeग्रामीणश्रमिक संघातर्फे फिजिकल डिस्टन्सींग सांभाळून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

श्रमिक संघातर्फे फिजिकल डिस्टन्सींग सांभाळून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न


मुंबई
 : सिएट टायर्स, भांडुप येथे युनियन मुंबई श्रमिक संघातर्फे फिजिकल डिस्टन्सींग सांभाळून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. सिएट टायर्स, भांडुप ही टायर्स उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १० वी  व १२ वी च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगार – कर्मचारी व काँट्रॅक्टच्या कामगारांच्या मुलांचा – मुलींचा गुणगौरव सोहळा सिटू संलग्न युनियन मुंबई श्रमिक संघातर्फे संपन्न पार पडला.

युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड प्रभाकर संझगिरी ( २५ सप्टेंबर ) यांच्या जयंतीदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १०१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी दहावी व बारावीच्या प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना बोलवूश कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच उर्वरीत गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक त्या – त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले. 

दहावी कक्षेत कामगार दिनकर काळे यांचे चिरंजीव राहुल याने ९७%  तर  अनिल कानडे यांची कन्या कुमारी तन्वी हिने ९५.२०% तसेच एस. एन. सिंग यांचे चिरंजीव रुद्रप्रताप याने ९२.२०% गुण पटकावले तसेच बारावी कक्षेत राजेश एस. तिवारी यांचे चिरंजीव रौनक याने ८९.८५% व संतोष एल. यादव यांची कन्या कुमारी ज्योती हिने ८५.३८% व शशिकांत कमाने  यांचा चिरंजीव यश याने ८४.९२ % गुण प्राप्त केले. 

यावेळी युनियनचे अध्यक्ष डॉ. कॉम्रेड विवेक मॉंटेरिओ, उपाध्यक्ष कॉ. सईद अहमद आणि सिएट टायर्सचे उच्च अधिकारी विकास शिर्के व डी. आर. कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी युनियनचे एस. के. यादव  व खजिनदार विनोद कोळेकर, श्रीमती  मंगल देवरुखकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सिएट टायर्स  युनिटचे जनरल सेक्रेटरी विनायक शिंदे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय