Sunday, May 19, 2024
Homeराज्यनाशिकमध्ये आशा व गटप्रवर्तकांचे जोरदार धरणे आंदोलन; सरकारला दिला इशारा

नाशिकमध्ये आशा व गटप्रवर्तकांचे जोरदार धरणे आंदोलन; सरकारला दिला इशारा

नाशिक : आशा गट प्रवर्तक मंजुर केलेल्या मागण्यांचा जीआर न काढल्यामुळे दि.१२ जानेवारी २०२४ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७५ हजार आशा व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८/१०/२०२३ ते दि.०१/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृती समितीसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत आरोग्य मंत्री यांनी खालील निर्णय घेऊन घोषणा केली होती.

१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार, २) आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, ३) गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री यांनी दि.०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता मा. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा, म.रा. यांनी मा. मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. दि.०९/११/ २०२३ रोजी मा. अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरुन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरुन १०००० रुपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत केल्याचे जाहीर केल्यामुळे दि. १०/११/२०२३ पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. तसेच आ. भा. कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवाय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत. संप स्थगीत होवुन दीड महिना होवुन गेला परंतु अदयाप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्या वतीने नागपुरच्या हिवाळी अधिकवेशनात दि. १८/१२/२०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि. २९/१२/२०२३ पासून ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकला आहे.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.
२.आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ
३.गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०००० ची वाढ
४. गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या.
५. आशा गट प्रवर्तक चे थकीत मोबदला द्या.
६. आशा गट प्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांना पंतप्रधान दौरा नाशिक वेळी पंचवटी पोलिस स्टेशन निरीक्षक तत्कालीन अनिल शिंदे यांनी अमानवीय वागणूक दिली. व पोलिस कोठडीत ठेवले. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा.

मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय काढला नाही. त्यामुळें राज्यातील ७५ हजार आशा व ४ हजार गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. त्वरित मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, यासाठी धरणे आंदोलन आयटक वतीने करण्यात आले ‌‌. तसेच उद्या १ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा परिषदवर जमून जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार आहे व तीव्र आंदोलन पुढे करू असा इशारा देण्यात आला आहे ‌‌.

यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष कॉ.राजू देसले, मयाताई घोलप, सुवर्णा मेतकर, अर्चना गडख, ज्योती खरे, कविता गवई, वैशाली देशमुख, अरुणा आव्हाड, सुषमा वटारे, सायली महाले, प्राजक्ता कापडणे, वैशाली कवडे, सविता अहीरे, अलका भोये,सुनिता कुलकर्णी, लक्ष्मी पगारे यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय