Friday, November 22, 2024
Homeजिल्हामंदाणे येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा -...

मंदाणे येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा – बिरसा फायटर्सची मागणी

रत्नागिरी : अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अशीच निवेदन मनोज पावरा राज्याध्यक्ष महाराष्ट्र, राजेंद्र पाडवी महासचिव बिरसा फायटर्स, संतोष वळवी तालुका अध्यक्ष शहादा यांनी प्रशासनाला पाठवली आहेत. 

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दिनांक ९ जुलै २०२१ रोजी एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा पैशाचे आमिष दाखवून विनयभंग करत जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. फिर्यादी वडीलांच्या सांगण्यावरून, मुलीचे वडील मजूरीचे पैसे मागण्यासाठी गावात गेले होते व मुलीची आई धुणीभांडी करण्यासाठी गावात गेली असता पीडीत १० वर्षाची मुलगी त्याच्या लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरीच होती. तेव्हा पैशाचे आमिष दाखवून संशयित आरोपी विश्वास रूपचंद पाटील रा.मंदाणे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला. त्यावरून मुलीच्या वडीलांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीवरून आरोपीला अटक झाली आहे.

आदिवासी समाजावरील मुलींवर व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच असल्याने अशा घटनेसंबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय