Sunday, May 19, 2024
Homeराजकारणउत्तर प्रदेश निवडणूक : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप,...

उत्तर प्रदेश निवडणूक : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप, सपाचा गंभीर आरोप


मुरादाबाद : उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच दुसरा टप्पा पार पडला. परंतु, यंत्रात गडबड झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

सायकल चिन्हावरचं बटण दाबलं की, मत कमळाला जात असल्याची स्टिप मिळते, अशी तक्रार समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. समाजवादी पक्षानं यासंदर्भातील एका मतदाराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकरणासंदर्भात निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षानं केली आहे.

महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही, ते कर्मदरीद्री आहेत – शिवसेनेची अण्णा हजारे यांच्यावर टीका

“मुरादाबाद ग्रामीण विधानसभा २७, बूथ क्रमांक ४१७ वर सायकल चिन्हावर बटण दाबूनही कमळाला मतदान दिल्याची चिठ्ठी मतदारांना मिळत आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनानं माहिती घेऊन निष्पक्ष चौकशी करावी”, असं समाजवादी पक्षानं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

व्हिडिओ : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर ६ वाहनांचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, सहारनपुर विधानसभा मतदार संघात देखील सायकल निशानीवर मत दिल्यास कमळाची स्लिप दाखवली जात असल्याचा आरोप सपाने केला आहे.

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय