Friday, November 22, 2024
Homeग्रामीणरेशनिंगचा काळा बाजार थांबवा, रेशनवर तेल, डाळी, इतर जीवनावश्यक वस्तू द्या -...

रेशनिंगचा काळा बाजार थांबवा, रेशनवर तेल, डाळी, इतर जीवनावश्यक वस्तू द्या – जनवादी महिला संघटना.

पिंपरी चिंचवड : रेशनिंगचा काळा बाजार थांबवा, रेशनवर तेल, डाळी, इतर जीवनावश्यक वस्तू द्यावेत, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकार रेशनवर फक्त गहू तांदूळ देते. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वंचित, उपेक्षित आणि दारिद्र्य रेषेच्या खाली ४० कोटी जनता आहे. रोजंदारी,अशास्वत कामाचे स्वरूप असलेला एक लाखाहून जास्त श्रमिक वर्ग पिंपरी चिंचवड शहरात आहे.

येथील रेशन व्यवस्था सुधारण्यासाठी नेमलेल्या दक्षता समित्या कोव्हिड महामारीच्या काळात अकार्यक्षम ठरलेल्या आहेत. त्यामुळे शहरात २२ रुपये किलो दराने तांदूळ गरिबांना न मिळत त्याच्या इडल्या बनवल्या जात आहेत. रेशनचा गहू १८ रु किलो दराने विकला जातोय. आणि त्याच्या कुर्डाया आणि शेवया तयार होत आहेत

रेशनवरील गहू तांदूळ काळ्या बाजारात पाहून गरिबांचे डोळे पांढरे पडत आहेत. 

अन्नसुरक्षा कायद्यातील अंतर्भूत गोडेतेल, साखर, शेंगदाणे, चहा, पौष्टीक डाळी, तिखट मीठ इत्यादी तेरा वस्तू सरकारने द्याव्यात. लोककल्याणकारी केंद्र राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शहरातील गरीबांना माणसी तेल, डाळी, शेंगदाणे याचे लवकर वितरण करावे.

अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, शीतल जेवळे, रिया सागवेकर, शेहनाज शेख, आशा बर्डे, वैशाली थोरात, विद्या सोनकांबळे, संगीता देवळे, निर्मला येवले,सुषमा इंगोले, रंजिता लाटकर, गोदावरी गायकवाड दिले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय