Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव, शांतता राखण्याचे...

व्हिडिओ : कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव, शांतता राखण्याचे केले आवाहन

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन चिघळलं; पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांनी शांतता राखण्याचे केले आवाहन


कोल्हापूर
: कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने आंदोलन चिघळलं आहे. अशात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झालाय. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरलाय. रस्त्यावर उतरत जमावाने दगडफेक देखील केली आहे. त्यामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळलं आहे. परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असल्याने जमाव पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.



कोल्हापुरात (Kolhapur) काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाेलिसांची माेठा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थिती चिघळल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत आहे.

कोल्हापुरातील वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “गोष्टी आम्हाला समजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही. अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगायाेग नाही. हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाकडून वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. तसेच औरंगजेबचे उदात्तीकरण कसे होत आहे याचा तपास सुरु असल्याचं, फडणवीसांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली.

गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.

परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय